महाराष्ट्राची ‘लालपरी’ झाली ७७ वर्षांची; शिरूर बस आगारात उत्साहात साजरा झाला वर्धापन दिन
शिरूर :सुदर्शन दरेकर (कार्यकारी संपादक )
१ जून – महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आणि ‘लालपरी’ या नावाने ओळखली जाणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (MSRTC) सेवा आज आपल्या स्थापनेचा ७७ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. शिरूर बस आगारात या दिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळपासूनच आगारात उत्साहाचे वातावरण होते. सर्व बसगाड्यांना फुलांची सजावट करण्यात आली होती. कर्मचाऱ्यांनी एकत्र येत ध्वजारोहण केले आणि एस. टी. महामंडळाच्या स्थापनेच्या इतिहासाला उजाळा दिला.
कार्यक्रमात आगारप्रमुख आगारप्रमुख मनीषा गायकवाड व सकाळचे जेष्ठ पत्रकार नितीन बारवकर यांच्या हस्ते शिरूर ते कुर्ला बसचे पूजन करण्यात आले,यावेळी मार्गदर्शन करताना म्हटले, “राज्यातील कोट्यवधी प्रवाशांची ‘लालपरी’ ही केवळ बससेवा नसून ती महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांना शहरांशी जोडणारा जीवनवाहिनीचा दुवा आहे. गेल्या ७७ वर्षांत ही सेवा अनेक अडचणींवर मात करत अखंडपणे सुरू आहे.”
यावेळी सेवा निवृत्त कर्मचारी, महिला चालक, परीक्षक यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
संपूर्ण दिवस ‘लालपरी’च्या आठवणींना उजाळा देत, तिच्या योगदानाचा गौरव करत शिरूर आगारात वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे आगारप्रमुखांनी सांगिलते.
यावेळी शिरुर प्रवाशी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद , सामाजिक कार्यक्र्ते प्रीतेश फुलडाळे ,, बसस्थानक प्रमुख भैरवनाथ दळवी, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बोरा , एस टी कामगार संघटनेचे माधव मुंडे , बापू जगताप कुंदन कांडेकर, समीर झगडे, अमोल साळुंखे , गणपती विभुते, आदी उपस्थित होते .
